निशिगंधा सहकारी बँकेची २९ वी .वार्षिक सर्वसाधारण सभा दि .२५ रोजी, दिवाळीपर्यंत सभासद व ग्राहकासाठी बँकेचे एटीएम सुरू करणार :-चेअरमन राजेंद्र जाधव

निशिगंधा सहकारी बँकेची २९ वी .वार्षिक सर्वसाधारण सभा दि .२५ रोजी,  दिवाळीपर्यंत सभासद व ग्राहकासाठी बँकेचे एटीएम सुरू करणार :-चेअरमन राजेंद्र जाधव

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै .पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेची 29 वी .वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि. 25 /8 /2024 रोजी सायंकाळी ठीक 4 वा. कार्यक्रमाचे ठिकाण श्रीयश पँलेस जोगेश्वरी मिसळ पाठीमागे के. बी. पी कॉलेज जवळ पंढरपूर येथे खालील विषयावर विचार करण्यासाठी आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिर्के यांनी दिली असून सभे पुढील विषय क्रमांक

 1) वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 31 /8/ 2023 चे इतिवृत्त वाचून कायम करणे, 2) दि.31 /3/ 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल व लेखा परीक्षित ताळेबंद नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे .

3) सन 2023 ते 2024 सालाचे वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे 

4)सन-2022 ते 2023 च्या लेखापरीक्षण पूर्तता अहवालाची नोंद घेणे .

5)सन- 2023 ते 2024 या वर्षाच्या नफा वाटणीस माननीय संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे मंजुरी देणे .

6) सन 2024 ते 2025 चे अंदाजपत्रकास मान्यता देणे व सन 2023 ते 2024 मध्ये कमी-जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे .

7)सन- 2024 ते 2025 साठी वैधानिक लेखा परीक्षकांच्या केलेल्या नेमणुकीस मान्यता देणे .

8)सन 2024 ते 2025 साठी अंतर्गत लेखा परीक्षकांच्या केलेल्या नेमणुकीस मान्यता देणे .

9) पोट नियम क्रमांक सात प्रमाणे वर्ष 2024 ते 2025 मध्ये बाहेरून उभारावयाच्या कर्जाचे मर्यादा ठरविणे .

10) संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे .

11 )वार्षिक सर्वसाधारण सभेत अनु उपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे .

12 )अध्यक्षांचे पूर्वपरवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर विचार करणे.

गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास सभा त्यास दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेण्यात येईल त्या सभेत गणपूर्ती नसली तरी विषयाचा विचार होईल 97 व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने सभासदांसाठी सहकार कायदा कलम 24 (अ )अन्वये सभासद प्रशिक्षण कार्यक्रम याच दिवशी याच ठिकाणी दुपारी 3 वा. आयोजित केलेला आहे तरी सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, अहवालातील ताळेबंद व नफा तोटा पत्रकाबाबत काही माहिती विचारावयाची असल्यास त्याकरीता लेखी निवेदन दि. 19 /8 /2024 दुपारी तीन वाजेपर्यंत बँकेत आणून द्यावे नंतर आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही ,सभेची नोटीस अहवाल ताळेबंद नफा तोटा पत्रक बँकेचे मुख्यालय व भाळवणी शाखेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केले आहे .सभासदांनी आपले शेअर्स सर्टिफिकेट बँकेच्या वेळेत घेऊन जावेत ,सभासदांनी नाव व पत्ता वारसदार बदलला असल्यास त्याची नोंद बँकेच्या शेअर्स विभागात करून घ्यावी ,सभासदांनी केवायसी चे पूर्तीसाठी आधार, पॅन कार्ड बँकेत दाखल करावेत .तरी बँकेच्या सभासद बंधू भगिनींनी आपल्या बँकेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाईस शिर्के यांनी केले .