श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने गणपती बाप्पाची सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने गणपती बाप्पाची सवाद्य भव्य दिव्य मिरवणूक

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर:-(दै.पंढरी नगरी न्यूज ) आज गणपती बाप्पा अनंत चतुर्दशी विसर्जना दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने गणपती बाप्पाची प्रदक्षिणा मार्गावरून भव्यदिव्य सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी दहा दिवस मान्यवरांच्या शुभहस्ते पूजा करुन गणेशोत्सव आनंदमय वातावरणात संपन्न केला.

या मिरवणुकी मध्ये कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके .सदस्या शकुंतला नडगिरे व्यवस्थापक मनोज श्रोत्री , मंदिरे समितीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थिती होते यावेळी सर्व कर्मचारी यांनी फेट्या बरोबर एकसारखा गुलाबी गणवेश सर्वांच लक्ष वेधून घेत होता. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेने पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याचे आवाहन आणि अनंत चतुर्दशी विसर्जना दिवशी गणपती बाप्पा दान करण्याचे आवाहन केले त्याप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने या अहवानाचा मान राखत गणपती बाप्पा शिवाजी चौकामध्ये नगरपरिषदेच्या संकलन केंद्रावर दान केला.सर्वांनी यांचे कौतुक करत खरोखरच हा स्तुत्य उपक्रम सर्वांनी राबवून गणपती नदीत पाण्यात टाकून पाण्याचे प्रदुषण करण्यापेक्षा गणपती बाप्पा दान करणे अतिशय आवश्यक काळाची गरज आहे.तसेच या गणेशोत्सवा निमित्ताने सहा दिवसांचा गणेशोत्सव संगीत महोत्सवाच ही अतिशय यशस्वी आयोजन करत पंढरपूरकर कलारसिकांना एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मेजवानी दिली‌.असेच उपक्रम राबवत मंदिरे समिती ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कायम कटीबद्ध असल्याचे दिसून आले.