सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन चोपळा ते मंदिर आरोग्यमंत्री गेले चालत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री  प्रकाश आबिटकर  यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन   चोपळा ते मंदिर आरोग्यमंत्री गेले चालत.

------------------------------------------------------------------------------------   

पंढरपूर,( दै पंढरी नगरी न्यूज):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवार, अति संचालक डॉ. संदीप सांगळे, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके उपस्थित होते.   

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चौफळा ते श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर व मंदिर परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे या अनुषंगाने मंत्री महोदय तसेच राज शिष्टाचार नुसार अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर समिती मार्फत वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री आबिटकर यांनी मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी लक्षात घेता. भाविकांना कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिर पर्यंत दर्शनासाठी चालत गेले.