सोलापूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभाग पंढरपूर विधानसभा अध्यक्ष महेश अधटराव यांच्यावतीने भाविकांना फराळ वाटप.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर:(दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभाग पंढरपूर विधानसभा अध्यक्ष महेश अधटराव यांच्या वतीने स्वखर्चातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहरांमध्ये आलेला भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. या फराळ वाटपामध्ये राजगिरा लाडू ,राजगिरा चक्की, आदि पदार्थ महेश आधटराव यांनी स्वखर्चातून वाटप केलेले आहे. पंढरपूर शहरातील झेंडा चौक येथे सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस सोशल मीडिया विभाग पंढरपूर विधानसभा अध्यक्ष महेश अधटराव यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक व भाविकांमधून कौतुक केले जात आहे.
यावेळी बोलताना महेश आधटराव म्हणाले की, की मी भाग्यवान आहे की माझा जन्म पंढरी नगरीत झाला आहे. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी, अशा चार यात्रा पंढरपुरात भरत असतात. या यात्रेकरिता लाखोच्या संख्येने भाविक येत असतात भाविकांची मनोभावे सेवा करणे आणि त्यांना अन्नदान करणे यात मी धन्यता मानतो. पंढरपूर नगरीत आलेल्या भाविकांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीने भाविकांची सेवा करत राहणारा असून वेगवेगळे सामाजिक उपक्रम भाविकांकरिता राबवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.