पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर च्यातीने दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर "सेवा पंधरवाडा" साजरा होणार :- मुख्यअधिकारी महेश रोकडे यांची माहिती...

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर च्यातीने दि. 17 सप्टेंबर  ते  02 ऑक्टोंबर "सेवा पंधरवाडा" साजरा होणार :-   मुख्यअधिकारी महेश रोकडे यांची माहिती...

------------------------------------------------------------------------------------     

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) दि 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीमध्ये "सेवा पंधरवाडा" म्हणून राबविण्याचा निर्णय आहे. या अनुषंगाने पंढरपूर शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता ही सेवा 2025 हा स्वच्छता उत्सव सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2025 अभियानात शहरातील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विविध संस्थांचे पदाधिकारी ,प्रतिष्ठित नागरिक इ. सहभागी होऊन सर्वांनी आपले घर, परिसर ,शहर कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता शहरातील प्रत्येक वर्गात स्वच्छता व आरोग्य विषयी चर्चासत्राचे आयोजन इत्यादी या स्वच्छतोत्सव पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.