खासदार प्रणिती शिंदे यांनी डोणगांव पूरग्रस्त भागाची केली पाहणी ◼️ डोणगाव व तेलगाव पुलाच्या दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांना केल्या तातडीच्या सुचना .. ◼️ संबंधित अधिकाऱ्याने पुलाचे काम निकृष्ट केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोर तक्रारी केल्या

खासदार प्रणिती शिंदे यांनी  डोणगांव पूरग्रस्त भागाची केली पाहणी  ◼️ डोणगाव व तेलगाव पुलाच्या दुरुस्तीबाबत अधिकाऱ्यांना केल्या तातडीच्या सुचना  ..  ◼️ संबंधित अधिकाऱ्याने पुलाचे काम निकृष्ट केल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोर तक्रारी केल्या

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील रस्त्यावरील पुलाची पाहणी केली. पूरस्थितीमुळे या पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पूरग्रस्त पाहणीदरम्यान खासदार शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ठाकरे यांना स्पष्ट सूचना दिल्या की, पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे पाणी पुलाखालून न जाता शेतातून रस्त्यावरून जात आहे. त्यामुळे नवीन शिडी वर्क करून भरावा टाकून रस्ता पुलाच्या लेव्हलने दुरुस्त करावा, जेणेकरून पुराचे पाणी रस्त्यावर येणार नाही.

नागरिकांनीही ठेकेदाराने पुलाखालील पात्रात जुने मटेरियल ठेवले असल्याची तक्रार केली. त्यानुसार, ते तातडीने काढून टाकावे व ओढा पात्राचे रुंदीकरण करावे अशा सूचना खासदारांनी दिल्या. तसेच डोणगाव स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने तातडीने नवा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

यानंतर खासदार शिंदे यांनी सीना नदीवरील दक्षिण सोलापूरला जोडणारा तेलगाव पुलाबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना म्हणाल्या की, पुलाची उंची कमी असल्यामुळे वारंवार पूर आल्यास दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी, वडापूर, गुंजेगाव, अकोले आदी गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी नवा पूल प्रस्तावित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार मुटकुळे यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

या वेळी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सचिन गुंड, उपसरपंच रमेश पाटील, वजीर शेख, राजाराम कोलते, रमाकांत चराटे, बन्सीलाल मेटे, तेलगावचे माजी सरपंच मोहन लांबतुरे, अप्पाशा आयवळे, खाजुभाई नदाफ, नाना कर्दळकर, प्रशांत रसाळ, नाना शिंगाडे, अक्षय गायकवाड, हणमंत जावीर, नितीन हेगडे, बाबा मोहिते, राहुल येरणाळे, सुहास गायकवाड, राजू आयवळे, गणेश गुळगे, चंदू जावीर, नागनाथ चराटे, शंकर राठोड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.