महा ई-सेवा, आधार केंद्रचालकांचा आजपासून संप ◼️ सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कोरके यांची माहिती

महा ई-सेवा, आधार केंद्रचालकांचा आजपासून संप   ◼️ सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कोरके यांची माहिती

------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्यातील ई- सेवा व आधार केंद्र संघटना यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन सादर केले आहे.

आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून (ता.12) तीन दिवस राज्यभर संप करण्यात येणार आहे, अशी माहिती महा ई-सेवा व आधार केंद्र संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कोरके यांनी दिली.

या सेवा केंद्रांना शासनाकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

या केंद्रांमुळे शासनाची दरवर्षी ३ ते ४ हजार कोटी रुपयांची बचत होत असूनही सरकार केंद्रचालकांच्या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेताना दिसत नाही. सेवा केंद्र संचालकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे. यावेळी राज्य निरीक्षक सुहास माळी पंढरपूर तालुका शहर महा-ई-सेवा व आधार केंद्र संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता मोरे, उपाध्यक्ष समाधान गुंड , सदस्य सचिन शिंगण,इ. पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.