पंढरपुर शहरातील सराईत गुन्हेगार / वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायदयांर्गत ०१ वर्षाकरीता येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द ◼️ शहर पोलीस वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे पंढरपुरात सर्जिकल स्ट्राइक

पंढरपुर शहरातील सराईत गुन्हेगार / वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायदयांर्गत ०१ वर्षाकरीता येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द   ◼️ शहर पोलीस वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे पंढरपुरात सर्जिकल स्ट्राइक

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) येथील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील शरीराविषयी गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती रोहित उध्दव कडलासकर रा. व्यासनारायण झोपडपटटी, पंढरपुर ता. पंढरपुर जि. सोलापुर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे, अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवुन वाळूचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरा लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती त्याचेविरुध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडप‌ट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, अत्यांवश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा १९८१ (एम.पी.डी.ए) मधिल कलम ३(१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक , सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशिर्वाद सोलापुर यांना पाठविणेत आला होता. त्याअनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन मा. जिल्हाधिकारी यांनी एम.पी.डी. ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेने स्थानबध्द इसमास ताब्यात घेवुन येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करणेत आलेले आहे.

तसेच सध्या पंढरपुर शहरामध्ये आदर्श निवडणुक आचारसंहिता लागु असुन नगरपालिका निवडणुकीचे अनुशंगाने पंढरपुर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५,५६,५७ व बीएनएसएस १६३ (२) अन्वये तडीपार करणेचे कामकाज सुरू आहे तसेच बी.एन.एस.एस १२९ व १२६ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील जवळपास २०० गुन्हेगारांवर निवडणुक कालावधीमध्ये गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता त्यांचेवर परिणामकारक प्रतिबंधक कडक कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से), अप्पर आधिक्षक. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, प्रशांत डगळे (भा.पो.से), पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, सपोफौ. कल्याण ढवणे पोलीस नाईक, सचिन इंगळे , सिरमा गोडसे, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, शहाजी मंडले, अनिस शेख , रतन जाधव यांनी केली आहे.