रांजणी- अनवली येथे शुक्रवार दि. 23 रोजी विविध - विकास कामाचा लोकार्पण समारंभ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची कार्यक्रमास उपस्थिती
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुक्यातील रांजणी व येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सोलापूर आयोजित आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना, आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र अनवली व नुकत्याच पूर्ण झालेल्या कामाचे सरकोली ते शंकरगाव रस्त्याचा लोकार्पण समारंभ करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 23 /2 /2024 रोजी सकाळी 9:00 वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेला आहे .
विविध विकास कामाचा लोकार्पण उद्घाटन सोहळा समारंभ सोलापूरचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सोलापूरचे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर लोकसभेचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, मोहोळचे आमदार यशवंत माने, पंढरपूर- मंगळवेढाचे आमदार समाधान आवताडे, सोलापूर विधान परिषदेचे माजी सदस्य तथा सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना चेअरमन प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, कासेगांव जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शिवाजीराव सावंत, श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, पंढरपूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती राजश्री भोसले, कार्यकारी अभियंता मंदार कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी प्रियंका जाधव, उप अभियंता शहाजन शेख इ.प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी सरपंच उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत रांजणी, अनवली, सरकोली, मुंढेवाडी, चळे, कोंढारकी, आंबे, ओझेवाडी, नेपतगांव, तरटगाव, शिरगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण रांजणी - ओझेवाडी रोड, रांजणी येथे आयोजित करण्यात आली आहे.