हॉटेल राजमुद्रा रिसॉर्टवर पोलिसांचा कारवाई ◼️ पाच पुरुषासह महिलाना घेतले ताब्यात ◼️संशयित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध रात्रभर कारवाई सुरू

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर - मोहोळ महामार्गावरील मौजे नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रिसॉर्टवर बेकायदा खुलेआम पणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनास समजली असता त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने छापा टाकून मोठी कारवाई केल्याने पंढरपूर परिसरात हॉटेल व्यवसायिकामध्ये खळबळ उडाली आहे या कारवाईमध्ये चार पीडित महिलांचे सुटका करण्यात आली असून पाच पुरुष आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे हे पंढरपुरात आल्यापासून पंढरपूर व इतरही तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य व काळे व्यवसाय करणाऱ्यावर दिवसेंदिवस कारवाई करण्याचा धडाकाच लावला आहे त्यातच पंढरपूर तालुक्यातील मौजे नारायण चिंचोली येथील पंढरपूर - मोहोळ महामार्गावरील असणाऱ्या नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रिसॉर्टवर बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने रात्री पोलीस प्रशासनातील टीमला सोबत घेऊन हॉटेल राजमुद्रा या रिसॉर्टवर अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली असल्याचे पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी कारवाई केल्याचे सांगितले.

या कारवाईमुळे पंढरपूर व इतर तालुक्यातील अवैद्य व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर ,पीएसआय विक्रम वडणे ,पीएसआय हमीद शेख, सागर गवळी ,हुलजंती ,आवटी आदी पोलीस कर्मचारी यांची मदत झाल्याचे सांगितले.