पंढरपूर तहसील कार्यालयीन कर्मचाऱ्यासाठी बायोमेट्रिक मशीन बसवण्याची नागरिकांची मागणी
----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर शहर प्रतिनिधी : पंढरपूर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर आपले कामावर हजर राहत असून अवेळी आपले कामावर दिसून येत असल्याने त्यांना बायोमेट्रिक मशीन बसवून हजेरी नोंद यावी .अशी मागणी सर्व नागरिकांनी होत आहे पंढरपूर तहसील कार्यालयातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे आपल्या मर्जीनुसार कामावर येत आहेत .त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ती आपल्या सोयीनुसार कार्यालयीन कामावर हजर होत असल्याचे दिसत आहे .
ग्रामीण मधील सर्वसामान्य नागरिक हे आपल्या कामानिमित्त तहसील कार्यामध्ये सकाळी कार्यालयीन वेळेत येत असतात .परंतु अधिकारी यांना मात्र सकाळी ९ वा ४५ ते ६ /१५ पर्यंत वेळेचा आदेश असताना मात्र ते त्यांच्या सोयीनुसार कार्यालयीन कामावर हजर राहत असल्याचे दिसून येत आहे .तर आणि कर्मचारी हे चहा पिण्याचे निमित्त करून बाहेरच भटकंती करत असल्याचे दिसत असल्याचे नागरिकांतून चर्चा होत आहे .
त्यामुळे कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना या सवयीमुळे कामाची बेशिस्त सवयी लागली आहेत .कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे नागरिकांची विविध प्रकारची अनेक कामे पेंडिंग असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या कामांना गती देण्याकरता तसेच शहर व तालुक्यातील नागरिकांची कामे वेळेवर होण्याकरिता व कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्याकरता व अनेक कर्मचारी वेळेत येत नाहीत .त्यामुळे कार्यालयामध्ये हजेरी पुस्तकावर सही घेऊन हजेरी नोंद घेण्यापेक्षा त्या ठिकाणी बायोमेट्रिक मशीन बसवून हजेरी नोंद घेण्यात यावी .जेणेकरून कर्मचारी अधिकारी लवकर आपले कामावर येतील त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून बे जबाबदार वागणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.