श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रासाठी बेंगलोर येथील भाविकांकडून १० लक्ष रूपयांची देणगी..!

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रासाठी बेंगलोर येथील भाविकांकडून १० लक्ष रूपयांची देणगी..!

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला बेंगलोर येथील भाविक श्रीमती रोहिणी नंदन निलेकणी यांनी अन्नदानासाठी रक्कम रू.१०.००/- लक्ष रूपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने लेखा अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते येथो चित मानसन्मान करण्यात आला. यावेळी  पोलीस निरीक्षक अरुण पवार ,संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे , पत्रकार शंकर कदम ,मंदिर समितीचे विभाग प्रमुख विनोद पाटील व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

मंदिरे समितीच्या वतीने श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दैनंदिन दुपारी १२.००  ते २.००व सायंकाळी ७.३०  ते ९.३०  या वेळेत मोफत अन्नदान करण्यात येते. त्याचा दैंनंदिन १२०० ते १५००भाविक लाभ घेतात. सदर अन्नछत्रात अन्नदान करण्यासाठी श्रीमती रोहिणी निलेकणी, बेंगलोर यांनी देणगी दिली आहे.