श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) महाराष्ट्र दिनानिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.

श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगन जोड, दंडपेट्या, मोत्याची कंठी, शिरपेच, मोत्याचा तुरा, मत्स्य जोड, तुळशीची माळ, तोडे, तांदळ्या हार, पदकासह लॉकेट, मोहरांची माळ आदी अलंकार परिधान करण्यात आले.

तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले.