तनाळी येथील श्री स्वामी समर्थ मठ तिर्थक्षेत्र "क " मध्ये समाविष्ठ ◼️ ग्रामस्थ व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण, ◼️ पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून यश, ग्रामस्थातून आमदार ,आवताडे यांचे आभार व्यक्त

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर -(दै.पंढरी नगरी न्यूज) श्री स्वामी समर्थ मठ, काशिलिंग नगर तनाळी या मठास आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र क दर्जामध्ये समाविष्ठ झाले मुळे श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती चांगुनाताई लवटे महाराज यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा सन्मान मंगळवेढा जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ मठामध्ये वर्षामध्ये हजारो भाविकांचे दर्शनासाठी गर्दी होत असते हे लक्षात घेऊन तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार समाधान आवताडे यांनी श्री स्वामी समर्थ मठासाठी आमदार फंडातून सुद्धा त्या ठिकाणी सभा मंडप दिले असून ते एक चांगलं तीर्थक्षेत्र व्हावे या उद्देशाने तीर्थक्षेत्र क मध्ये सामील केल्यामुळे या भागातील भाविकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

यावेळी सुभाष ढेकळे-पाटील , बिरु मासाळ , दिगंबर मोटे, विठ्ठल लवटे महाराज,माजी ग्रा.पं.सदस्य सुरेश मोटे,औदुंबर मोटे, केरप्पा लवटे, अनिल कोळी ,अरुण शिवशरण महाराज, बिरुदेव मेटकरी, प्रा. दत्तु लवटे , व्यंकटेश लवटे, देविदास लवटे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.