भालेवाडी ग्रामपंचायत विकास कामासाठी २ कोटी रूपये मंजूर ,विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.....

भालेवाडी ग्रामपंचायत विकास कामासाठी २ कोटी  रूपये मंजूर ,विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.....

------------------------------------------------------------------------------------

मंगवेळढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत भालेवाडी येथे मंगळवेढा- पंढरपूर विधानसभेचे  आमदार समाधान  आवताडे यांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटी विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण  सोहळा  कार्यक्रम दि. 26 जानेवारी रोजी संपन्न झाला.


    
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद माजी सभापती शिला शिवशरण पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, मंगळवेढा पोलीस स्टेशनचे PI रणजीत माने , दामाजी शुगर चे माजी संचालक विजय माने, दामाजी शुगरचे माजी संचालिका स्मिताताई म्हामाणे.  एम.डी. सर्जन डॉ शार्दुल कुलकर्णी, मंगळवेढा आगार चे प्रमुख संजय भोसले,  तानाजी काकडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिन शिवशरण यांनी आमदार  भालेवाडी गावासाठी दिलेल्या दोन कोटी च्या विविध विकास कामांचे वाचन केले. तसेच नूतन सरपंच श्रीकांत दवले यांनी एक वर्षांमध्ये भालेवाडी ग्रामपंचायत साठी कोण कोणती कामे केली व कोणकोणते योजना मार्गी लावल्या तसेच कोणकोणते प्रस्ताव प्रगतीत आहेत याची माहिती दिली. 
        
आमदार  समाधान  आवताडे  यांनी  सरपंच श्रीकांत दवले यांच्या कार्यकारिणीने एक वर्षांमध्ये केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. आतापर्यंत दिलेला निधी याची कामे व्यवस्थित करून घ्या.  शिवाय भविष्यात भालेवाडी ग्रामपंचायत साठी कोणते प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही.  तसेच भालेवाडी साठी नवीन ग्रामपंचायत इमारत  मंजूर  करत आहे असे सांगितले. तसेच तसेच  भागवत गवळी गुरुजी यांनी केलेली शंभू महादेव मंदिराला ब वर्ग दर्जा द्यावा अशी मागणी केली त्यानंतर आमदार अवताडे यांनी तात्काळ प्रयत्न करून सोडवण्याचे आश्वासित केले. 

सदर कार्यक्रमाचे आभार  प्रशांत काटे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य वर्षाराणी गवळी, उषाताई गवळी,  तंटामुक्तीचे अध्यक्ष दुर्वेधन गवळी, रामभाऊ घाडगे, दिलीप शिवशरण, आबा गवळी, श्रीकांत गवळी, मारुती दवले सर ,महादेव दवले,अर्जुन शिवशरण, श्रीकांत गवळी, अरुण गवळी ,सुनील गवळी,महादेव भोरकडे रेखाताई गवळी इ. ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.