पंढरपुरातील सराईत वाळु तस्कर महेश शिंदे येरवडा कारागृहात स्थानबद्ध
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर : (दै.पंढरी नगरी न्यूज), येथील पंढरपूर शहर पोलीस ठाणे हदटीत अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर आणि सराईत गुन्हेगार महेश तानाजी शिंदे रा. इसबावी, पंढरपुर यास एक वर्षाकरीता एम. पी.डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेने त्यास ताब्यात घेवुन "येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.
सराईत आरोपी महेश शिंदे हा दहशत माजवण्या करीता वाळुचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे, लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे केले आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 मधीत प्रकरण 6 व 17 मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होती. त्याचे विरूध्द अनेकवेळा अवैधपणे वाळु व्यवसाय तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होती. परंतु तो सदर गुन्हयात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता. तो कायदयाला जुमानत नव्हता. म्हणुन पोलीस निरीक्षक श्दशरथ वाघमोडे यांनी स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे मार्फत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पाठविणेत आला होता. त्याअनुशंगाने एम. पी.डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले होते.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापुर ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी नितीन जगताप, सपोफौ कल्याण ढवणे, शरद कदम, पोलीस नाईक सचिन इंगळे स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस शेख, सायबर सेलचे रतन जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर यांचेकडील विलास म्हेत्रे यांनी केली आहे.