जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन
---------------------------------------------------------------------------------
संतोष कुमार जाधव- जिल्हा ग्रंथालय अधिकारी ,सोलापूर यांची माहिती,
---------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रु हा जन्मदिन "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने 'जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर व हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २७ फेब्रु- २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती आवश्यक आहे.
व्याख्यान :- मराठी भाषा साहीत्य आणि संस्कृती व्याख्याते - डॉ. शिवाजी नारायण शिंदे, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ ठिकाण हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, अशोक चौक, पोलीस चौकीसमोर, सोलापूर वेळ:- १०:४५ वाजता. सर्वांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.