पंढरपूरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न : ** विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण -तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपूरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न :   ** विविध योजनांच्या 1 हजार 23  लाभांचे वितरण                                                    -तहसीलदार सचिन लंगुटे

---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) :- पंढरपूर येथे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.02 ऑगस्ट रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंढरपूरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

यश पॅलेस, कराड रोड पंढरपूर येथे 252 पंढरपूर विधानसभा मतदासंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या शिबिरास आमदार समाधान आवताडे,  प्रांताधिकारी सचिन इथापे, बी.आर. माळी, तहसीलदार सचिन लंगुटे, मदन जाधव, गटविकास  अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका कृषी  अधिकारी सुर्यकांत मोरे, तालुका आरोग्य  अधिकारी डॉ. एकनाथ बोधले ,  पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे पदाधिकारी व   नायब तहसिलदार, मंडलाधिकरी, तलाठी  आणि कर्मचारी उपस्थितीत होते.

या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.
 

यावेळी 252 पंढरपूर विधानसभा मतदासंघातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांना जिवंत सातबारा उतारे 310, राज्यातील  महिलांना शेतकरी दर्जा देण्याबाबतचे प्रमाणत्र वाटप 42, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते 07, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 37, घरकुल लाभार्थ्यांच्या योजनेसाठी विशेष तरतूद 20, शेतीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफ 13, राज्य शासकीय योजनांचा लाभ 265,  स्थानिक स्वराज संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ 50, इतर विविध योजनांचे लाभ 279 असे एकूण 1 हजार 23 लाभ देण्यात लाभांचे वितरण करण्यात आले. 

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. महसुली कामे तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असल्याचे सांगितले.

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली. तसेच शासकीय योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व निकष याची माहिती ही नागरिकांनी घेतली.

शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समाधान शिबिरामधून एकाच वेळी मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.