सेवानिवृत्ती झालेल्या जेष्ठ मान्यवरांचा सिद्धेवाडीत आज सन्मान सोहळ्याचे आयोजन..

सेवानिवृत्ती झालेल्या जेष्ठ मान्यवरांचा सिद्धेवाडीत आज सन्मान सोहळ्याचे आयोजन..

---------------------------------------------------------------------------------
  
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे सालाबाद प्रमाणे  पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या आणि चालू वर्षी ३१ मे २०२४ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी या मान्यवरांचा  कृतज्ञतापूर्वक सन्मान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी रविवार १४ मे रोजी सायंकाळी  ७:३०वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण मारुती मंदीर पटांगणात हा सेवापूर्ती सन्मान सोहळा होणार असून कार्यक्रमास सिद्धेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच  रोहिणी सारंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे म्हणून व्याख्याते शहाजी देशमुख हे व्याख्यान होणार आहे .तरी कार्यक्रमास विठ्ठल  साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव, पांडुरंग शुगर चे माजी संचालक नागनाथ शिंदे,  वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, विठ्ठल चे विद्यमान संचालक दशरथ जाधव, उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर , पोलीस पाटील दत्ता जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष बजरंग जाधव  इ प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी गावातील १) आण्णासाहेब पांडुरंग गोडसे सर, २)  डॉ. जे. जी. जाधव सर,  ३) सुरेश तायाप्पा सावंतराव, ४) भारत सीताराम जाधव, ५)   शारदा भारत जाधव, ६) तुकाराम त्र्यंबक जाधव, ७) लक्ष्मण चिंतामणी जाधव,  ८)सर्जेराव रामचंद्र जाधव, ९) दगडू धोंडीबा सावंतराव, १०) शांतीनाथ महादेव जाधव, ११) सुशीला मधुकर राक्षे १२) श्रीम. मंदाकिनी चांगदेव गोडसे या सर्वांना सन्मानित करण्यात येणार आहे.

हा आपल्या गावाचा, आपल्या कुटुंबीयांचा सन्मान आहे; असे समजून या कार्यक्रमास गावातील बंधू-भगिनी व सहकुटुंब सहपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सेवापूर्ती सन्मान सोहळा समिती, सिद्धेवाडी यांच्यावतीने केले आहे.