दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी शाखेचे उद्घाटन..

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी  शाखेचे उद्घाटन..

***************************************************

पंढरपूर;(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी या शाखेचे उद्घाटन मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर तालुका पोलीस स्टेशनच्या मागे गाळा नंबर ३ येथे या शाखेचे उद्घाटन सोहळा आयोजन करण्यात आला आहे.

श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड या शाखेचे उद्घाटन सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक हे आहेत व प्रमुख पाहुणे म्हणून बोधले महाराज, भगीरथ भालके, शिवाजीराव काळुंखे सर, अभिजीत आबा पाटील, डी वाय एस पी विक्रम कदम, नागेश काका भोसले, प्रकाश पाटील, बी पी रोंगे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

तरी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांनी व सभासद वर्ग यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड संस्थापक व चेअरमन नागेश फाटे यांनी केले आहे.