पंढरपुर शहर पोलीस ठाणे, "गुन्हे प्रकटीकरण शाखेची" धडाकेबाज कामगिरी. ⚫घरफोडीतील सोन्याचे दागीने चोरनाऱ्या आरोपी कडुन १७,०१,५००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.
--------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) : - पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५४०/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०५ (अ) ३३१(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयामध्ये एकुण १७,०१,५००/- रू किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागीने चोरीला गेले बाबत गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा दि.२५ रोजी १३/१६ वा चे पुर्वी सदर गुन्हयात आज्ञात चोरटयाने सोन्याचे दागीन चोरले बाबत सांगत होते. त्या अनुषंगाने तपास चालु केला असता सदर वर्णना बाबत कोठेही व काहीएक पुरावा मिळुन आला नाही तसेच गोपनिय बातमीदार यांचेकडुन वरील वर्णनाच्या आरोपी बाबत काहीएक माहिती मिळुन आली नाही. सदर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने पोलीस अधिक्षक, अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत डगळे, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण, यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व आजुबाजूचे सी.सी.टी. व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात आरोपी इसम नामे १) सुनिलकुमार रामसिंग राजपूत वय. २६ वर्षे, रा. मुळग्राम बिकापुरी पोस्ट हिरापुरा भिंड हिरापुरा मध्यप्रदेश संध्या रा. आढेगाव टेंभुर्णी ता. माढा, जि. सोलापूर, यांचा दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांला दिनांक २७/०८/२०२६ रोजी अटक करून त्याला विश्वसात घेवुन तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले व सदर घरात चोरीला गेलेले १२.५० तोळे सोन्याचे दागीने व ३० भार चांदीचे दागीने असे व असा एकुण १७,०१,५००/-रू जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे पंढरपुर उपविभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली पोसई सुप्रिया रावण, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, सपोफौ सुजित उबाळे, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह २७४ अनिल बनसोडे, पोह १४१३ अस्लम काझी, पोह ८०५ गणेश पवार, पोकॉ १२४० हर्षद ठाकर, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोकॉ १२३६ सांवत, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ १८८७ प्रविण मेटकरी, यांनी केली आहे.