पंढरपूरात नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान.

पंढरपूरात नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान.


---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज) :- नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.

श्री विठ्ठलास पगडी,कौस्तुभ मणी,दंड पेट्या,मोत्याच्या कंठ्या, हिऱ्याचे कंगन जोड,तुळशीची माळ,जानवे, तोडे जोड,शिरपेच, मोत्याचा तुरा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच, रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, जवमणी पदक, चिंचपेटी तांबडी, जवळच्या माळा, लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.