पंढरपुरात मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी दि.७ रोजी तीव्र आक्रोश आंदोलन. ◾️ संघर्षयोद्धा मनोज जरांगे - पाटील यांच्या समर्थनार्थ, ◾️शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
---------------------------------------------------------------------------
पंढरपूर, (दै.पंढरी नगरी न्यूज ):- संघर्षयोद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या अंतरावाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाज यांच्या वतीने देण्यात आली. पंढरपूर येथे सोमवार दि.७ रोजी सकाळी १०.वाजता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन व महाराष्ट्र सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज पंढरपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरांगे -पाटील हे अमरण उपोषणास बसले आहेत.
त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवून आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी भव्य आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.