प्रसिद्ध नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांच्या जीवनाविषयी थोडेसे….

प्रसिद्ध नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांच्या जीवनाविषयी थोडेसे….

--------------------------------------------------------------------------
पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज) : आज डॉ. लागू यांचा जन्मदिन आहे. सातारा येथे १६ नोव्हेंबर १९२७ साली त्यांचा जन्म झाला होता. मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील ते नामवंत अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतांनाच श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.