भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बुध दि.१२ रोजी मोळी पूजन समारंभ

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बुध दि.१२ रोजी मोळी पूजन समारंभ

_____________________________________________________

मोहोळ;( पंढरी नगरी न्युज ): टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा . गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दिनांक १२ /१०/ २०२२ रोजी गव्हाणीत मोळी पूजन करून हंगामाचा शुभारंभ करणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (अण्णा )जगताप यांनी दिली.

यावेळी सदर कारखान्याचे चेअरमन तथा संसद रत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब भीमराव महाडिक व त्यांच्या सुविद्म पत्नी अरुंधती धनंजय महाडिक या उभयतांचे व तालुक्यातील कारखान्याचे जेष्ठ सभासद मच्छिंद्र टेकाळे पापरी .हरिभाऊ चवरे पेनुर. अंबादास भोसले अंकोली .पंडित बाबर पुळुज व दिलीप चव्हाण टाकळी सिकंदर या पाच ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते सकाळी  १०:४५ वा.गव्हाणीत मोळी पूजन करून गळीत हंगामाचा शुभारंभ कारखाना कार्यस्थळ होणार आहे.

तरी सदर मंगल प्रसंगी कारखान्याचे सभासद. हितचिंतक . कामगार अधिकारी. कर्मचारी. खाते प्रमुख यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. शिंदे यांनी केले आहे.