जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत पंढरपूरच्या वर्षा बरबडे - पाटील व पंकज राठोड विजयी

जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत   पंढरपूरच्या वर्षा बरबडे - पाटील व पंकज राठोड विजयी

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज) नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी पतसंस्थेच्या  संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री .स्वामी समर्थ पॅनल मधून महसूल कर्मचारी संघटनेचे पंढरपूरच्या  वर्षाताई बरबडे पाटील व सिद्धेश्वर पॅनल मधून पंकज राठोड हे मोठ्या मताधिक्याने  विजय झाल्याने पंढरपूर  व मंगळवेढा तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वर्षाताई बरबडे -पाटील ह्या सध्या पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी, नेपतगाव या ठिकाणी तलाठी पदावर काम करीत असून पंकज राठोड हे मंगळवेढा येथील उपविभागीय (प्रांत कार्यालय) प्रभारी नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावीत आहेत दोघांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल पंढरपूर व मंगळवेढा उपविभाग कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात आले . यावेळी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडून सहकार्य करणार असल्याचे बरबडे -पाटील व प्रभारी नायब तहसीलदार मंगळवेढा पंकज राठोड यांनी सांगितले .या निवडणुकीत महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सिद्धेश्वर पॅनलचे प्रमुख शंतनु गायकवाड यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे.