सिद्धेवाडीतील श्री.रमेश जाधव व श्री. दीपक जाधव यांना शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार जाहीर..

सिद्धेवाडीतील श्री.रमेश जाधव व श्री. दीपक जाधव यांना शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक गुणवंत पुरस्कार जाहीर..

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
इसबावी प्रशालेतील शिक्षक श्री. रमेश जाधव यांचा चौकार...
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील रमेश सुखदेव जाधव(सर) व दीपक कबीर जाधव (सर) यांना सोलापूर जिल्हा स्तरावरील आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी वरिष्ठ निवड समितीने निवड केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून दोन्ही आदर्श शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची मोहोर उमटली आहे.तर इसबावी येथील मोहसीन विद्यालयातील शिक्षक रमेश जाधव( सर ) यांनी मात्र आदर्श  शिक्षक गुणवंत पुरस्कार मिळवण्यात सलग चार वेळा हा पुरस्कार मिळवत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळविण्यात चौकार मारल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मोहसीन विद्यालय इसबावी येथील रमेश जाधव (सर )यांना जाहीर करण्यात आला.

या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक १५  रोजी सकाळी १०:३० वाजता सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती यंदाचा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले मुख्याध्यापक संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी माने यांनी दिली आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, उपसंचालक राजेंद्र अहिरे ,माध्यमिक शिक्षण विभावाचे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे ,प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी , योजना विभागाच्या अधिकारी सुलभा वटारे, मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक सुभाष माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणारा आहे .

तसेच सिद्धेवाडी चे दुसरे सुपुत्र दीपक कबीर जाधव यांना सोलापूर येथील समाजासाठी कार्यरत असणारी निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेने शैक्षणिक ,कला, क्रीडा ,सामाजिक सांस्कृतिक ,क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार दिला जातो या निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट संस्थेने दीपक जाधव सर यांना शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार सोलापूर येथील लोकमान्य टिळक सभागृह तळमजला हिराचंद्र नेमचंद वाचनालय पार्क स्टेडियम येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे यांनी दिली. दीपक जाधव ( सर ) हे सध्या सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सोनंद( ता.सांगोला) येथे कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दोन्हीही शिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष ,पदाधिकारी , प्रशालेतील शिक्षक ,सोनंद ,इसबावी, सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांमधून त्यांचे प्रत्यक्ष भेटून ,फोनवरून अभिनंदनपर कौतुक होत आहे.