संभाजी ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी दत्ता ताड
_________________________________________________
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे व प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार आज सोलापूर जिल्ह्यातील निवडी जाहीर करण्यात आल्या .संभाजी ब्रिगेडच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी एकलासपूर येथील दत्ता ताड यांची निवड करण्यात आली. दत्ता ताड हे गेली २५ वर्ष संभाजी ब्रिगेड चे काम करत आहेत .याआगोदर त्यांनी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष पदावर आठ वर्ष काम केलेले आहे.शिवराज्य पक्षाचे जिल्हाअध्यक्ष पदावर काम केलेले आहे. सध्या ताड यांच्या पत्नी एकलासपूर ग्रामपंचायतच्या महिला सदस्य म्हणून काम करीत आहेत .पुणे येथील भांडारकर, जेम्सलेन प्रकरणातही ७२ क्रांतीवीरापैकी एक आंदोलक आहेत. त्यांनी चळवळीच्या जीवनामध्ये अनेक आंदोलने करून समाजाला न्याय देण्यांचे काम केलेले आहे.पुन्हा एकदा त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शासकीय यंत्रणेमधील भ्रष्टाचार ,निकृष्ठ दर्जाची कामे व या मध्ये होणारे गैरव्यवहार, निष्क्रिय व सुस्त प्रशासन यांच्या विरोधात आंदोलने करून समाजातील शेवटच्या घटकाला व माझ्या पदाला न्याय देण्याचे काम करणार असल्याचे तालुक्यातील बहुजन समाजातील युवकांना बरोबर घेऊन विविध प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले दत्तात्रय ताड यांची संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे एकलासपूर तसेच तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमधून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे. पंढरपूर शहर अध्यक्ष स्वागत कदम. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप. बाळासाहेब बागल. प्रमोद जगदाळे .अनिल यादव किरण कचरे. शेखर आटकळे .महादेव पवार. मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष नितीन जाधव सर .रणजीत जगताप. अरुण फाळके. नितीन आसबे यांनी उपस्थित राहून निवडीचे अभिनंदन केले.