१ लाख पुस्तक वाचनाचा उपक्रम मनाशी संकल्प असलेल्या हरहुन्नरी अवलीया शिक्षक साहेबराव भुसे यांचा यथोचित सत्कार..

१ लाख पुस्तक वाचनाचा उपक्रम मनाशी संकल्प असलेल्या हरहुन्नरी अवलीया शिक्षक साहेबराव भुसे  यांचा यथोचित  सत्कार..

-----------------------------------------------------------------------------------
निमित्त होते श्रीमत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्म शताब्दीचे
-----------------------------------------------------------------------------------

आटपाडी  (दै.पंढरी नगरी न्यूज ) : येथील आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संस्थेचे चेअरमन माननीय अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व वाचन कट्टा समूहाचे दिनेश देशमुख यांच्या संकल्पनेतून हा एक लाख पुस्तक वाचनाचा उपक्रम  राबवलेला आहे. त्यात १ लाख पुस्तक वाचनामध्ये पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील रहिवासी असणारे एक अवलीया  शिक्षक  साहेबराव भुसे  यांनी शंभर पुस्तकांचे वाचून करून त्याचे आकलन केले .

त्याबद्दल संस्थेचे चेअरमन  अमरसिंह देशमुख यांनी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष सुमन नागणे ताई ,संस्थेचे सचिव एच यु पवार सर ,संस्थेचे निरीक्षक चौगुले सर , मुख्याध्यापक आर .बी. गायकवाड सर ,मोकाशी मॅडम तसेच संस्थेतील इतर प्रशालांचे मुख्याध्यापक, शिक्षक व वाचन कट्टा समूहातील सहकारी यावेळी उपस्थित होते.
 
हरहुन्नरी वाचक असलेल्या साहेबराव भुसे सर यांनी वाचलेल्या पुस्तकांमध्ये  महाराष्ट्रातील नामवंत लेखकांची  पुस्तके आहेत. त्यामध्ये वि. स. खांडेकर, व. पु. काळे,  यशवंतराव चव्हाण, डॉ.ए. पी .जे अब्दुल कलाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरद पवार, सुहासिनी शहा , ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. प्रा. एन. डी. पाटील ,लक्ष्मण गायकवाड,  रॉबिन शर्मा, प्रबोधनकार ठाकरे, शरद तांदळे अशा विविध लेखकांची नामांकित पुस्तके वाचन करून त्यांचे आकलन केले आहे .भुसे सर हे  सध्या  याच संस्थेमध्ये शिक्षक म्हणून पिलीव येथील जवाहरलाल  शेतकी विद्यालय येथे काम करीत   आहेत.