*खा .शरद पवारांच्या गाडीत आभिजीत पाटील दिसल्याने विरोधकाना दे धक्का:-*
***********************************************
*पंढरपूर,(प्रतिनिधी):-* टेंभुर्णी येथील एका कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अभिजीत पाटील यांची भेट झाली. कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटलांना गाडीत बसण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो मानत शरद पवारांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला गेल्याने विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील व देशाचे मा. कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या गाडीत बसल्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्या व तालुक्यात याची चर्चा होत असून या घटनेचा अभिजीत पाटील विरोधकांना जबर धक्का बसल्याचे यावरून खा.शरद पवार व चेअरमन अभिजीत पाटील यांची राजकीय नाळ घट्ट असल्याचे दिसून आले .
नुकतेच ईडीच्या छापेमारीने चर्चेत आलेले अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या गाडीत बसले आणि गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. या सर्व प्रकारामुळे शरद पवार अभिजीत पाटील यांच्याशी कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार याची चर्चा रंगली आहे. टेंभुर्णीपासून शेवटपर्यंत या दोघांमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
येणाऱ्या काळात अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या चर्चेला आता उधाण आले आहे. कारण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अभिजीत पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर सहा साखर कारखाने व्यवस्थित चालवून दाखवले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवून अभिजीत पाटील यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विठ्ठलचे गेल्या दोन वर्षांपूर्वीचे उसाचे बिल अभिजीत पाटलांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील नेतृत्वाची पोकळी अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून भरून निघेल, असे शरद पवारांना वाटत असल्यामुळे त्यांनी अभिजीत पाटलांना सोबत घेऊन आज प्रवास केल्याचे बोलले जात असून. आता हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या दिशेने सुरू असल्याचे यावरून दिसून येत.