*श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सोमवारी आयोजन:*
------------------------------------------------------------------------------
*पंढरपूर,(प्रतिनिधी):-* वेणू नगर गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सन . २०२१-२०२२ आर्थिक वर्षाची ४७ वी आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याची चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २६/०९/ २०२२ रोजी दुपारी १:०० वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी संचालक डी आर गायकवाड यांनी दिली .
दिनांक ३०/३/२०२२ रोजी झालेल्या ४५ वर्ष ४६ अधिमंडळाच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे. सण २०१९ ते २२ या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवालाची नोंद घेऊन अहवाल स्वीकारणे दिनांक ३१ मार्च२०२२ अखेरच्या हिशोबाचे ताळेबंद पत्रकास व दिनांक १/४/२०१९ ते २१/२२ या कालावधीच्या नफा तोटा पत्रास मंजुरी देणे. जी.एस थोरात अँड कंपनी चार्टर्ड अकाउंट वैधानिक लेखापरीक्षक पुणे यांचे कडून दिनांक १/४/२०१९ ते २१/२२ या कालावधीचा आलेला वैधानिक लेखापरीक्षण तपासणी अहवाल स्वीकारणे.
तसेच आर्थिक वर्ष २०२०/२०२१ चा संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे. सन.२१/२२ या वार्षिक वर्षाकरिता संचालक मंडळाने नेमणूक केलेली वैधानिक लेखापरीक्षक यांचे नेमणुकीस व लेखापरीक्षण शुल्कास मान्यता देणे. सन.२२ /२३ या आर्थिक वर्षाकरिता शासनाने वैधानिक लेखापरीक्षकाच्या नाम तालिकेमधून वैधानिक लेखा परीक्षेची नेमणूक करणे. व त्याचे लेखापरीक्षण शुल्क ठरवणे. सन. २१/२२ या आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने नेमणूक केलेली आयकर वस्तू व सेवा कर सल्लागार कायदेशीर सल्लागार व इतर सल्लागार यांचे नेमणुकीस व मेहनत राहण्यास मान्यता देणे सन. २२ /२३ या आर्थिक वर्षाकरिता हिशोब तपासणी आयकर वस्तू सेवा कर सल्लागार कॉस्ट ऑडिटर कायदेशीर सल्लागार तसेच आवश्यकतेनुसार इतर सल्लागारची नेमणूक करणे. व मेहनताना ठरवणे सन.२१/२२ वर्षातील अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे सन,२२ /२३ करिता संचालक मंडळाने तयार केलेल्या महसुली व भांडवली खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे. सन २०/२३ या वर्षाकरिता संचालक मंडळास बाहेरून निधी उभारण्याचे अधिकार देणे. व विचार करणे सन २१/२२ या आर्थिक वर्षात विक्री केलेल्या स्क्रॅप मटेरियलची नोंद घेऊन त्यास मान्यता देणे. कारखान्याच्या सभासदास भागाचे दर्शनी मूल्यमध्ये वाढ करणे संबंधी माननीय सचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार पोट दुरुस्ती स्वीकारत करणे बाबत निर्णय घेणे.यापूर्वीचे संचालक मंडळ कालावधीत ताळेबंद व नफा तोटा पत्रकात सामान्यता स्वीकृत लेखातत्त्वानुसार जमा खर्च न केल्याने त्यांचा वित्तीय वर्ष २१/२२ या पुढील ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर होणाऱ्या विपरीत परिणामाबद्दल सभासदांना अवगत करणे सन २०१६ ते २०२२ या माजी संचालक मंडळ काळातील निदर्शनास आणून दिलेल्या गैरव्यवहाराची नोंद घेऊन संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे बाबत निर्णय घेणे सन, २१/२२ या वर्षाच्या आदी मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस गैरहजर राहणीबाबत सभासदांच्या अर्जावर निर्णय घेणे. इत्यादी विषयावर सभेमध्ये चर्चा करण्यात येणार असून या सभेस शेतकरी सभासद कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक डी आर गायकवाड यांनी केली.