सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीचा बिगूल दिवाळीपूर्वी वाजणार..
_________________________________________________
सोलापूर;(प्रतिनिधी):- सोलापूर येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या असून या पतसंस्थेचे निवडणूक दिवाळीपूर्वीच घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.पी एल खंडागळे यांनी दिली.
सोलापूर येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सत्ताधारी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव पाटील व शिवाजीराव पाटील या गटाचे सध्या वर्चस्व असून पतसंस्थेत एकूण सात हजार शिक्षक सभासद मतदार आहेत .जिल्ह्यातील तेथील सहकारी संस्थांच्या निवडनुकीचा मार्ग मोकळा झाला असून शासनाने या निवडणुका दिवाळीपूर्वीच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असताना थांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा आता बिगूल वाजणार आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने अतिवृष्टीमुळे १५ जुलै २०१२रोजी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३०सप्टेंबर पर्यंत थांबवण्यात आला होता. त्यासाठी मुदत वाढ नसण्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्वतंत्र परिपत्रक काढून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील ३३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती त्यापासून सुरुवात होणार आहे. त्या सहकारी संस्थांमध्ये विशेषता सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे निवडणूक प्रक्रिया आता सुरू होणार असून त्याची प्रक्रिया वेगाने होणार असल्याचे निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.