निशिगंधा सहकारी बँकेची पत सभासदांमध्ये असल्याने बँकेची बिनविरोध निवड --कल्याणराव काळे यांची माहिती.
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज) पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेची सेवा सर्वसामान्य ,सभासद ,खातेदार ,व्यापारी वर्गाना चांगल्या प्रकारे आजपर्यंत देण्यात आली असून त्याची पावती म्हणून बँकेची पत या सर्व वर्गामध्ये असल्यानेच बँकेची बिनविरोध निवड झाल्याची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली .पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेचे संचालक मंडळाची सन २०२२-२३ते २०२७ -२८ या कालावधी करिता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले .
निशिगंधा सहकारी बँकेची स्थापना सन १९९७ साली प्रभाकर लाड गुरुजी यांनी केली. बँकेच्या कामकाजात पारदर्शकता आणून विद्यमान चेअरमन तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे तसेच संचालक मंडळ यांनी खातेदार व सभासदांना सन २०१० पासून मोठी नेत्रदीपक उज्वल कामगिरी केली असल्यानेच बँकेच्या सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले त्यामध्ये अधिक विश्वास संपादन होऊन पंढरपूर मुख्य शाखा तसेच भाळवणी शाखेची आर्थिक स्थिती बँकेच्या सभासदांसाठी भक्कम आहे .
बँकेचे आर्थिक व्यवस्थापन व नियोजन चांगले असल्याने शासनाच्या सहकार विभाग राज्य सहकारी बॉक्स फेडरेशन व कोल्हापूर यांचे कडून उत्कृष्ट सेवेबद्दल बँकेस गौरविण्यात आले. बँके मार्फत आजपर्यंत शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पत बघून त्यात राजकारण न आणता शासनाच्या कै.अण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास मागास विकास मंडळाच्या विविध योजने अंतर्गत जवळपास १२५ पेक्षा जास्त गरजूंना सुमारे १० ते १२कोटी पर्यंत रुपयाची कर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकेची पंढरपूर शाखा व भाळवणी शाखा या दोन्ही शाखेचे मुख्य व्यवस्थापक म्हणून कैलास शिर्के यांचे नीटनेटके आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने होत असल्याने सभासद, खातेदार सर्वसामान्य, नागरिक, व्यापारी वर्ग यांना विश्वासात घेऊन बँकेचा गाडा हाकत असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून बोलले जात असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------------------------------------------------------------
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा या योजनेतील शहर व तालुक्यातील लाभार्थ्यांना आपली रक्कम मिळण्याकरिता योग्य सोई व मार्गदर्शन उपलब्ध .
------------------------------------------------------------------------------------
संचालक मंडळाच्या १३ जागेसाठी बँकेचे बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - कल्याणराव वसंतराव काळे, राजेंद्र बबनराव जाधव ,भानुदास बलभीम सावंत, डॉ. राजेंद्र मुरलीधर जाधव , सतीश प्रभाकर लाड ,डॉ. मंदार सुभाष सोनवणे , महेश प्रकाश पटवर्धन , वैभव विलास साळुंखे, महिला मतदारसंघातून प्रतिनिधी अँड क्रांती रविकिरण कदम ,शोभा दत्तात्रय येडगे, अनिल नारायण निकते, भागवत वासुदेव चवरे(महाराज ) ,देविदास विठ्ठल सावंत या सर्वांची बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पी. पी दुरगुडे यांनी आज जाहीर केले.