मुंढेवाडी येथील जमिनीला मुरूम तस्कराचा मोठ्या प्रमाणात विळखा..

मुंढेवाडी येथील जमिनीला मुरूम तस्कराचा मोठ्या प्रमाणात विळखा..

-------------------------------------------------------------------------------------
वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्याची नागरिकातून मागणी..
-------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यात वाळू तस्करावर महसूल विभागाने काहीशा प्रमाणात कारवाई केल्याचे वरवर दिसत असले तरी वाळूमाफी यांनी आता सोने ऐवजी चांदीकडे आपली वक्रदृष्टी ठेवून आपला मोर्चा कासेगाव कोंढारकी वाहया  मुंढेवाडी येथे मुरूम तस्करीसाठी वळविला असल्याचे निदर्शनास येत आहे. हे गाव, वाळूतस्करीसाठी प्रसिद्ध आहे.आता या गावाने पैसे कमावण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात मुरूम तस्करीही सुरू केली असल्याचे उघड झाले आहे. पंढरपुरातील एका बड्या ठेकेदाराने येथील तीन एकर जमिनीतून भरमसाठ मुरूम उपसला असल्याचे उघड झाले आहे. सध्याही हा मुरूम उपसा नेटाने व दिवसाढवळ्या सुरू आहे. याचा पंढरपूर ते ओझेवाडी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर या प्रवासधारकांना वाहनातून उडणाऱ्या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांतून महसूल प्रशासनाच्या अलबेल कारभाराविषयी याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूर तालुक्यात मुरूम पुरवणारे अनेक बडे ठेकेदार महसूल खात्याशी जवळीकता साधून कमी कालावधीत जास्त पैसा उपलब्ध करण्याकरता या गोष्टीचा पर्याय शोधला आहे यांच्याकडे जेसीबीसह मुरूम पुरवणारी टिपर , ट्रक , ट्रॅक्टर अशी यंत्रणाही उपलब्ध आहे. शेतकऱ्याकडून एकरावर मुरूम ठरवून वारेमाप मुरूम उपसला जातो, आणि त्यातून बक्कळ पैसा कमावला जातो. असे अनेक ठेकेदार मुंढेवाडी परिसरात घुसले आहेत. याचा उघड प्रत्यय मंगळवारी आला आहे.

टाकळी येथील मुरूम ठेकेदार ही मुरूम तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर कोंढारकी रस्त्यालगत डाव्या बाजूला असणाऱ्या मुंढेवाडी येथील जमिनीतून, गेल्या महिनाभरापासून भरमसाठ मुरूम उपसला गेला आहे. हा मुरूम अजनसोंड मुंढेवाडी आणि पंढरपूर शहरात आणला जात असल्याची माहिती खुद्द मुरूम उपसणाऱ्या ठेकेदाराने दिली आहे.

शेत जमिनीतून विनापरवाना मुरूम उपसणे आणि त्याची वाहतूक करणे हे बेकायदा आहे. महसूल विभागाची परवानगी काढूनच मुरमाची वाहतूक केली जाऊ शकते. परंतु या ठिकाणी बेकायदा मुरूम उपसला जात असल्याचे उघड झाले आहे. याबाबत संबंधित गावचे तलाठी काझी यांना विचारले असता, त्यांनी कानावर हात ठेवले आहेत. संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी झालेल्या मुरूम उपशावर पंढरपूर महसूल विभाग कारवाई करणार काय ? ज्याच्या शेतजमिनीतून हा उपसा करण्यात आला आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार काय ? याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शेतजमिनीतून वारेमाप मुरमाचा उपसा केला जात आहे. या मुरमाची अनेक ठिकाणी वाहतूक केली जात आहे. ही बाब संबंधित तलाठ्यास माहित नव्हती. आता या ठिकाणी होणाऱ्या मुरूम उपशावर कारवाई केली जाणार काय ? ज्याच्या जमिनीतून हा उपसा होत आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार काय ? याकडे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.