पंढरपूरात बालसंगोपन योजनेच्या एकल पालक व बालकांचा स्नेह मेळावा बक्षिस वितरण उत्साहात संपन्न...

पंढरपूरात बालसंगोपन योजनेच्या एकल पालक व बालकांचा स्नेह मेळावा बक्षिस वितरण   उत्साहात संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तपकिरी शेटफळ ता . पंढरपूर संचलित " क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या एकलपालक महिला व लाभार्थी बालकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला .यावेळी १० वी १२ पास लाभार्थ्यांना बक्षिस वितरण व सन २०२६/२७ या आर्थिक वर्षाचे योजना मंजुरी आदेशाचे वितरण सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अविनाश मगर पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे याचेउपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले . संस्थेतर्फे 10 वी १२ वी च्या लाभार्थी बालकांना कॉलेजला जाण्यासाठी सॅग चे वाटप करण्यात आले . सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण मंडळावर नवनियुक्त सदस्य जितेंद्र बनसोडे, ॲड . अक्षय बनसोडे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला .यावेळी नूतन विशेष कार्यकारी अधिकारी भरतकुमार कांबळे , शंकर कांबळे यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी पत्रकार सुधाकर कवडे यांनी शासकिय योजना एखादया हाडाच्या कार्यकर्त्याच्या हाताशी लागली तर त्या योजनेच सोन कस होत याच उदाहरण म्हणजे शत्रुघ्न कांबळेसर राबवित असलेली पंढरपूर शहर व तालुक्या साठी" क्रांतीज्योती सावित्री बाई फुले बाल संगोपन योजना " होय असे गौरव उदगार काढून संस्था अनाथ निराश्रीत एकल पालक बालकांसाठी राबवित असलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले . यावेळी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा दक्षता समितीचे नूतन सदस्य जितेंद्र बनसोडे यांनीही आपले विचार मांडून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या . यावेळी प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बालसंगोपन योजनेचे मानद प्रकल्प संचालक शत्रुघ्न कांबळे सरांनी संस्था राबवित असलेल्या बालसंगोपन योजनेच्या कामाचा आढावा सादर केला .

यावेळी संस्थेकडे असलेल्या २०० पैकी ११५ लाभार्थी बालकांना दहा ते बारामहिन्याचे बालसंगोपन योजनेचे अनुदान बालकांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा झाले असून उर्वरित बालकांनाही अनुदान सोडण्याचे काम शासन स्तरावरून चालू असल्याचे सांगीतले या योजनेच्या पालकांनी योजना नुतनीकरणासाठी आवशक कागदपत्रे वेळेत संस्थेकडे जमा करावीत असे आवाहन केले . या कार्यक्रमात पालकांनी अतिशय भावनीक होवून आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना संस्थेचे कामकाजाचे तोंड भरून कौतुक केले . जिल्हा बाल सरक्षण अधिकारी नितीन थोरात यांनी शासनाच्या योजनेची सविस्तर माहिती देवून संस्था राबवत असलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या . पंचायत समिती सभापती डॉ . शुभम आगवणे यांनी बालसंगोपन योजनेचा प्रसार आणि प्रचार जिल्ह्यातील प्रत्येक गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचे जाहीर केले .

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते डॉ . अंकुशराव राहूल मोरे, सोलापूर जिल्हा चाईल्ड लाईनचे प्रमुख आनंद ढेपे व टीम तालुका व शहरातील लाभार्थी ,पालक , विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बालसंगोपन योजनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . पालकांचे शुभहस्ते बालसंगोपनचे कर्मचारी अतुल सटाले सर ,गणेश मासाळ , चंदू बोडके ,श्रीमती अनिता राऊत, श्रीमती शशिकला मलगनकर, भरतकुमार कांबळे , हर्षराज कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला .

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व बालसंगोपन योजनेचे मानद प्रकल्प संचालक शत्रुघ्न कांबळे सरांचा सत्कार उपस्थित पाहुण्यांचे शुभहस्ते करण्यात आला . सूत्रसंचालन शिक्षक सोसायटीचे संचालक शशिकांत कांबळे गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार संस्थेच्या सोशल वर्कर श्रीमती शशिकला मलगणकर यांनी केले .