पंढरपूर तालुका शिक्षक पतसंस्थे च्या निवडणुकीत बाळासाहेब काळे गुरुजी प्रणित गुरुसेवा पॅनलचे वर्चस्व तर विरोधी स्वाभिमानी शिक्षक पॅनल चा टांगा जोरात पलटी
---------------------------------------------------------------------------------
जुनी पेन्शन संघटनेत मोठी फूट -------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज ) : सहकार क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची अर्थवाहिनी असणाऱ्या पंढरपूर तालुका प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बाळासाहेब काळे (गुरुजी ) नेतृत्वाखाली शिक्षक संघाची संभाजी थोरात गट शिवाजी पाटील गट व शिक्षक भारती युतीच्या गुरुसेवा पॅनलने विरोधी असणाऱ्या शिक्षक समिती व जुनी पेन्शन च्या स्वाभिमानी पॅनलचा अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत धुवाउडवीत गुरुसेवा पॅनलने १७ जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे .या पतसंस्थेची निवडणूक रविवारी दिनांक १९ रोजी पंढरपूर येथील द कवठेकर प्रशालेत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ४९५ पैकी ४८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब काळे (गुरुजी )यांनी निवडणुकीमध्ये संभाजी थोरात गट व शिक्षक भरती शिक्षक संघटनेच्या प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर विश्वासात घेऊन गुरुसेवा पॅनलच्या कांचन गोरे व रोहिणी होमकर या २ महिला प्रतिनिधीना बिनविरोध निवडून आणून विजयी सलामी देऊन चाणक्यपण दाखवत विरोधकांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर १५ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मतदानानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली त्यामध्ये गुरु सेवा पॅनलचे सर्व १५ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले निकालानंतर शिक्षक सोसायटीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे व या निवडणुकीचे संघटन कौशल्य असणारे बाळासाहेब काळे (गुरुजी )यांच्या अध्यक्षतेखाली विजयी उमेदवार कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली.
यावेळी सभेस शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ क्षीरसागर शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतीराम बोंगे, सोलापूर जिल्हा पतसंस्थेचे माजी अध्यक्ष उत्तम जमदाडे ,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अरुण नागणे, जुनी पेन्शन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब दराडे , प्राथमिक शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सरस्वती भालके, शिक्षक नेते का. वि. वाघमारे, शेखर कोरके, शांताराम गाजरे, तालुका अध्यक्ष संजय हेगडे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय येडगे, रामचंद्र यादव, दादाराजे देशमुख ,पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष पांडुरंग कोरके, सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या संचालिका राणी होनमारे लेंगरे ,शिक्षक नेते तात्यासाहेब यादव ,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील गुरुजी, दिगंबर शेळके, इत्यादीनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले.
विजयी झालेले उमेदवार खालील प्रमाणे - सर्वसाधारण गट - सुहास थोरात (३५०) ,एकनाथ फाळके (३३५) विजय बागल( ३३५) ,संजय दुपडे (३३३),धनाजी जाधव( ३२४), राजकुमार जमदाडे( ३१४),प्रकाश जाधव (३१३) ,अण्णासाहेब व्यवहारे (३१३ ),दत्ता माने( ३१२), रामचंद्र सावंत (३०८), नितीन गावडे (३०३ ), गुरुनाथ खटकाळे (२९६), इतर मागास प्रतिनिधी लक्ष्मण लोणकर( ३१३), भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी मारुती घोडके (३४५), अनुसूचित जातीचा प्रवर्ग प्रतिनिधी शशिकांत कांबळे (३२१), उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने विरोधक शिक्षक समिती व जुनी पेन्शन संघटनेच्या स्वाभिमानी पँनलला या पंचवार्षिक निवडणुकीत पूर्णपणे पराभवास सामोरे जावे लागल्याने निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.