सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन..

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन..

------------------------------------------------------------------------------

सांगोला(प्रतिनिधी)/- राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अडीअडचणी बाबत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने राज्याचे  उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते सांगोला येथे  कार्यकर्त्यांच्या गाठी भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.

त्यावेळी विविध मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले .यामध्ये अनुदान वाढ वाचन दिनाच्या दर्जाबद्दल नवीन वाचनालयाला मान्यता थकित असलेल्या अनुदान पहिल्या हप्ता दिवाळी पूर्वी वाचनालयाच्या खात्यावर जमा करण्यात यावा. इत्यादी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व वाचनालयाच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले .यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील .ग्रंथालय चळवळीतील मार्गदर्शक चेतन सिंह केदार .सांगोला तालुका ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश गंभीरे .बबन सावंत सर .सदाशिव शिंदे सर .मासिक मासिक परिवाराचे संपादक औदुंबर काळे .संचालक दत्तात्रय पाटील .सतीश इंगोले .शरद कोळवले संतोष मोरे .अमर कुलकर्णी. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.