नागरीक व अधिकार्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसे मागणार्या तोतया तिघा पत्रकार वर गुन्हा दाखल
-----------------------------------------------------------------------------------
सांगोला(पंढरी नगरी न्यूज) :गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला व वाळू वाहतुकी सह अन्य नागरिकांना व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेलिंग करून दादागिरी करणार्या तोतया पत्रकार चंद्रकांत ऐवळे, शुभम ऐवळे व ज्यांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नसताना एका राज्यातील नामवंत संघटनेची बदनामी करणार्या ज्ञानेश्वर लोखंडे यांच्यावर अखेर पोलिसांविषयी जनसामान्या च्या मनात अप्रीती भावना निर्माण करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
चंद्रकांत ऐवळे व शुभम ऐवळे हे एका यूट्यूब चैनलला काहीजणांचे शूटिंग करतात कुणाच्यातरी मुलाखती घेतात रात्रंदिवस वाळू वाहतुकीसह सर्वसामान्यांना त्रास देतात. पैसे मागतात दोनच दिवसांपूर्वी कोळा परिसरात यांना काही नागरिकांनी पैसे मागताना चोप चोप चोपलेही आहे. सद्या हे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगोला पोलिसांनी सांगितले. दि. 28 एप्रिल रोजी 19:00 वाजता मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी सुनिल मोरे यांच्याविषयी ज्यांचा प्रहार संघटनेशी काहीही संबंध नसताना ज्ञानेश्वर लोखंडे यांची मुलाखत घेऊन त्यांच्याबद्दल टीव्ही 7 न्यूज या युट्युब चॅनलला बदनामी करणारी बातमी सोशल मिडियावर टाकून बदनामी केली आहे.
या बातमीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने रात्री पेट्रोलींगच्या नावाखाली वाळूची वसुली करणारा वाळु माफिया सुनिल मोरे हा स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध वाळूची वाहने पकडुन त्यांच्याकडुन चिरीमीरी घेवून ते अवैध वाळुची वाहने सोडुन देतात. उपविभागीय पोलीस अधिकारी यांना खोटे रिपोर्ट करतात. 23 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 10:30 वाढेगाव येथील शिवाजी चौक येथे थोरला मळा येथे अवैध वाळूचे वाहन सांगोला पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा वाळू माफिया पोलीस नाईक सुनिल मोरे यांच्या टिमने पकडले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा वसुलदार सुनिल मोरे याच्या ताब्यात सांगोला पोलीसानी दिले. सदरची गाडी सांगोला पोलीसानी पोलीस स्टेशनला आणण्याच्या बहाण्याने घेवुन गेले व त्यांनी वाळु माफियाकडुन 40000/- रु घेवुन परस्पर सोडुन दिल्याची चर्चा वाळु माफियात होत असून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातील वसुलदार सुनिल मोरे या वाळू माफिया पोलीसाची जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी चौकशी करून त्याना तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीन आंदोलन करण्यात येईल वगैरे मजकुर स्पष्टपणे प्रसारित करण्यात आलेला आहे.
हा मजकुर व्हॉटस अॅपच्या अनेक ग्रुपवर प्रसारित करण्यात आलेला आहे. या बातमीमुळे पोलीसांविषयी बदनामीची भावना निर्माण झालेली आहे. जनसामान्यांमध्ये पोलीसांविषयी अनादर निर्माण झालेला आहे. पोलीस अंमलदार यांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करु नये या भावनेने खोटया व न घडलेल्या प्रकारास अतिरंजित करुन बनावट मजकुराची ऑडीयो, व्हिडीयो क्लीप व्हायरल केलेली आहे.
ही बातमी सार्वजनिकपणे प्रसारित करुन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची तसेच पोलीस प्रशासनाची जाणीवपुर्वक बदनामी केलेली आहे. पोलिसांविषयी बदनामीकारक क्लीप प्रसारित करून आरोपी चंद्रकांत ऐवळे, शुभम ऐवळे दोघे रा. सांगोला आणि ज्ञानेश्वर लोखंडे रा. बुर्लेवाडी ता. सांगोला यांनी पोलीसांविषयी जनसामान्यांच्या मनात अप्रिती भावना निर्माण केलेली आहे. म्हणुन माझी वरील तिघांविरुध्द पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम 1922 चे कलम 3 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे सांगोला शहर व तालुक्यात अनेकांना व्हिडिओ शुटींग करून ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी करीत आहेत. रात्रंदिवस हे तिघेजण गोरगरीब नागरिकांना त्रास देऊन पैशाची मागणी करीत आहेत. यापूर्वी या तिघांनाही अनेकवेळा नागरिकांनी मारहाण करूनसुध्दा यांच्यात अद्यापपर्यंत बदल झालेला नाही. आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करू, आम्ही तुमच्यावर पोलीस केस करू अशी भीती घालतात. यामुळे नागरिकांमध्ये यांच्याबाबतीत घबराटी निर्माण झाली आहे. हे आमच्यावर तक्रार करतील या भीतीने नागरीक यांच्यावर तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. यापुढे नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता या तिघांनी ब्लॅकमेलिंग केले किेंवा पैसे मागितले तरी बिनधास्तपणे तक्रार करावी हे तोतया पत्रकार असून यापूर्वी अनेकवेळा यांच्यावर खंडणीचेही गुन्हे दाखल झाले आहेत. स्वतःच्या सख्या भावाचीसुध्दा फसवणूक करून जमीन आपल्या नावावर केली आहे. याचा गुन्हाही दाखल झाला असून ही बाब न्यायप्रविष्ट आहे. फक्त वाळूच्या बातम्या देऊन पैसे उकळणारेच हे पत्रकार आहेत. यांच्या युट्युब चॅनलला वाळू सोडून कोणतीही बातमी अद्यापपर्यंत देता आली नाही. पिता व पुत्र या दोघा तोतया पत्रकारांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिली वेळ आहे.
पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी यांच्यासह अनेक नागरिकांना व गोरगरीब जनतेला सतत ब्लॅकमेलिंग करत आहेत. तुमची माझ्याकडे बातमी आलेली आहे, पैसे न दिल्यास आम्ही तुमच्या विरोधात बातम्या करू अशा प्रकारे धमकावले जाते. अनेकवेळा चंद्रकांत भगवान ऐवळे, शुभम चंद्रकांत ऐवळे व ज्ञानेश्वर लोखंडे यांनी पैसे न दिल्यामुळे अनेकांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. अनेकांची माहिती माहितीच्या अधिकारात मागत आहेत. अनेक अधिकार्यांच्या विरोधात उपोषणे करून ब्लॅकमेलिंग करीत आहेत. समाजसेवेचा आव आणून ज्ञानेश्वर लोखंडे हा मी तालुक्याचा दादाच असल्याप्रमाणे वागत आहे. चंद्रकांत ऐवळे व शुभम ऐवळे यांनी रात्रंदिवस शहर व तालुक्यात फिरून ब्लॅकमेलिंग करून त्रास देणे एवढाच उद्योग सुरू केला आहे. यांना अनेकांनी आपला कधीतरी पापाचा घडा भरेल, आपण नागरिकांना, अधिकार्यांना, पोलिसांना नाहक त्रास देऊ नये असा सल्लाही दिला. परंतु हम करे सो कायद्याप्रमाणे हे कामकाज करीत असल्यामुळे अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सांगोला शहर व परिसरात नागरिकांना आवाहन करण्यात येते की, चंद्रकांत भगवान ऐवळे, शुभम चंद्रकांत ऐवळे व ज्ञानेश्वर लोखंडे यांनी जर कुणाला पैशाची मागणी केली किंवा व्हिडिओ शूटिंग करून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला स्वतःहून धाव घेऊन गुन्हा दाखल करावा असे आवाहन करण्यात आले असून त्यांचा कोणत्याही पत्रकार संघटनेशी काहीही संबंध नसल्याचे पत्रकार सुरज लवटे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.