विजापूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील गौडा- पाटील यांनी घेतले विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन, मंदिरातील पुरातन विभागाच्या कामाची केली पाहणी
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) कर्नाटक राज्याचे गृहमंत्री तथा बी. एल. डी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष नामदार एम. बी .पाटील यांचे बंधू विजापूरचे विधान परिषदेचे आमदार सुनील गौडा- पाटील यांनी विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आमदार सुनील गौडा- पाटील हे विधान परिषदेवर दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवडून आले होते. त्यानिमित्त ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शनाकरिता आले असता त्यांचे मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांच्या शुभहस्ते आमदार सुनील गौडा- पाटील यांचा स्वागत पर सत्कार करण्यात आला .

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामाचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिररात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामाची माहिती यावेळी मा.संचालक तानाजी जाधव यांनी दिली. यावेळी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव कासेगाव येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार सोपान काका तोडकर ,चिचुंबे येथील महादेव घुले (सर )यांनी आमदार सुनील गौडा- पाटील यांचा स्वागत करून सत्कार करण्यात आला.
