त.शेटफळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल संगोपन योजनेचे कामकाज सुरू - अध्यक्ष शत्रुघन कांबळे

त.शेटफळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल संगोपन योजनेचे कामकाज सुरू - अध्यक्ष शत्रुघन कांबळे

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) शेटफळ (ता.पंढरपूर) येथील  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय संचालित "क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना " गावातील व परिसरातील  ग्रामस्थांना  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने "क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविली जाते. या योजनेचा गावातील गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघन कांबळे सर यांनी केले आहे.

ही योजना या आर्थिक वर्षापासून सदर आपल्या परिसरातील गरजू लाभार्थ्या पर्यंत पोहोचविण्या करिता आमचे ग्रंथालयाचे माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्या पर्यंत सदर योजना पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव आपल्या ग्रंथालयात दि. ३१ ऑगष्ट २०२३ पर्यंत सादर करावेत असे नम्र आवाहन आपल्या गावातील व पंचकृषीतील नागरीकांना करण्यात येत आहे. सदर योजनेकरिता विहित नमुन्यातील अर्ज ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनेमध्ये ० ते १८ वर्षाच्या आतील एकल पालक विद्यार्थांना वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा रु २२५०/- ( दोनहजार दोनशे पन्नास)  इतके अनुदान शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अधिक माहितीसाठी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी ग्रंथालयास भेट द्यावी. असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष शत्रुघन कांबळे सर यांनी केले.