प्रांताधिकारी गजानन गुरव यांना विठ्ठल मंदिर समितीतून दाखवला बाहेरचा रस्ता

प्रांताधिकारी गजानन गुरव यांना विठ्ठल मंदिर समितीतून दाखवला बाहेरचा रस्ता

--------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरचे प्रांत अधिकारी म्हणून सचिन ढोले यांची कारकीर्द कोरोना काळात अतिशय उल्लेखनी ठरली होती सर्व सामान्य जनतेने रात्री अपरात्री जरी फोन कॉल केला तरी त्यास प्रतिसाद देण्याची तत्कालीन प्रांत अधिकारी सचिन ढोले यांची कार्यपद्धती या शहर तालुक्यातील जनतेस भावली होती आणि याचीच प्रणिती म्हणून सचिन ढोले कमालीचे लोकप्रिय ठरले होते.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून विठ्ठल जोशी यांनी कार्यकाळ सांभाळण्यापूर्वी तत्कालीन प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्याकडेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार होता. आणि त्यांनी ही जबाबदारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली होती मात्र पुढे श्री.ढोले यांची पुणे येथे पुरवठा विभागाच्या सह आयुक्तपदी बढती झाली होती. पंढरपूरचे प्रांत अधिकारी म्हणून गजानन गुरुव आले याचवेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची बदली झाल्याने समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

मागील वर्षी २८ डिसेंबर रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचा कार्यकाळ संपल्याने गजानन गुरव यांनाच प्रशासक म्हणून पाठवण्यात आले तिन्ही जबाबदाऱ्या पार पडत असताना गजानन गुरव यांची कार्यपद्धती सतत वादग्रस्त ठरत राहिली महावीर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या कार्यपद्धती विरोधात थेट मंत्रालय शासन स्तरावर स्थानिक नागरिकांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपात भजन कीर्तन स्पीकर्स लावण्यात प्रतिबंध करून गजानन गुरव यांनी आपली कर्तव्य दक्षता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला खरा पण वारकरी संप्रदाय आणि विविध पक्ष संघटना यांनी आधीच आपल्या पद्धतीने आपल्या कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या विरोधात रान तापले होते. वरिष्ठ पातळीवरून तक्रार दाखल केल्या आणि याचीच परिणीती म्हणून गजानन गुरव यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात सुरू असलेल्या भजन कीर्तन आधी बाबतच्या निर्णयास बगल द्यावी लागली होती. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत काहीच बदल होत नव्हता याबाबत नाराजी काही कमी होऊ शकली नाही.

आज २८ सप्टेंबर रोजी प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्याकडील मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार राज्य शासनाने तातडीने काढून घेतला असल्याचे पत्र वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण वीर महाराज यांनी सांगितले त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत असून शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या विविध विकास कामाबाबत विविध पक्ष संघटनांनी यावर नाराजी व्यक्त करूनही दखल घेतली नाही

याखाली पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासक पदाची जबाबदारी देखील शासनाने काढून घेत सर्वसामान्य जनतेची कनेक्टिव्हिटी असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे सोपवत पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या वरील भार कमी करून अशी मागणी केली होती. आघाडी सरकारच्या सत्ता काळात आपण तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा संदर्भात भेट घेतली होती.