वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून रवींद्र काकडे उत्कृष्ट यांना उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर पुरस्कार जाहीर;... 20 पुरस्कर्त्यांचा कार्यक्रमात होणार सन्मान

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून रवींद्र  काकडे उत्कृष्ट यांना उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर पुरस्कार जाहीर;...   20 पुरस्कर्त्यांचा कार्यक्रमात होणार सन्मान

------------------------------------------------------------------------------------

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर रवींद्र काकडे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर  पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू- पाटील यांनी माहिती दिली .ऊस उत्पादनात आणि साखर उद्योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, कारखाने आणि अधिकाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा झाली असून संस्थेमार्फत दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

सुधाकरपंत परिचारक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातील फायनान्स मॅनेजर रवींद्र काकडे यांनी कारखान्यातील आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने करून कारखान्याच्या प्रगतीत उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने त्यांना उत्कृष्ट फायनान्स हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे संभाजीराव कडू - पाटील यांनी सांगितले आहे .त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस दर, ऊसतोड कार्यक्रम योग्य पद्धतीने राबविला जात असतो अशा नावाजलेल्या सहकारी कारखान्यातील अधिकाऱ्यास उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधाकरपंत परिचारक श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक, व्हाईस चेअरमन कैलास खुळे (सर ) तसेच सर्व संचालक मंडळ ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी रवींद्र काकडे यांचे अभिनंदन केले आहे.