नवोदय विद्यालयात गुरुनानक जयंती साजरी
-------------------------------------------------------------------------------------
दै.पंढरी नगरी न्यूज : जवाहर नवोदय विद्यालयात मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी शीख धर्माचे संस्थापक , देशभक्त ,समाज सुधारक, कवी, विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे गुरुनानक यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आजचे एम.ओ .डी. श्रीमती एस .आर. अलसेट द्वारा प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक , विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.एस. आर . अलसेट मॅडम यांनी गुरुनानक यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून देऊन या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या . कुमारी संजना चौगुले या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे संचालन श्री. एच. जी .जाधव यांनी केले.*