तावशी गावात दिवसा धाडसी दरोडा टाकून चोरट्यांनी अंगावरील सोने पळविले, पोलीसग्रस्त वाढवण्याची ग्रामस्थाची आक्रमक मागणी..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ वाजून ४५ मिनिटांनी गणेश सुभाष आसबे यांचे राहते घरी चोरट्यांचा धाडसी दरोडा पडला . गणेश असबे हे नोकरी निमित्त अमरावतीला असतात त्यांचे घरी त्यांची पत्नी सौ करिष्मा आसबे व आई कस्तुरा असबे या दोघीच घरी असतात सदर घटनेवेळी करिष्मा आसबे या भांडी घासत असताना त्यांचे तोंड दाबून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू अंदाजे तीन तोळे त्यामध्ये अडीच अडीच ग्रॅमच्या दोन अंगठ्या पाच ग्रॅमची एक अंगठी एक ठुशी व मंगळसूत्र असा एकूण तीन तोळे सोने लंपास केले. संध्याकाळी पावणे नऊ वा. पडलेल्या दरोडेने ग्रामस्थ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर दरोडे ची बातमी ग्राम सुरक्षा दलाच्या मार्फत आले असता शेकडोंच्या संख्येने जमाव गणेश आसबे यांच्या घराकडे जमा झाला .
घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार सचिन आटपाडकर, प्रशांत शिंदे यांचे यांचे सह. तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोच झाले . इतक्या लवकर हा धाडसी दरोडा पडल्याने ग्रामस्थांसह पोलिसही चक्रावले आहेत . या दरोडे मुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे, सदर घटनास्थळी सरपंच गणपत यादव, उपसरपंच अमोल कुंभार ,अँड. तानाजी सरदार यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते . घटनेची माहिती मिळताच स्वतः डी .वाय .एस .पी अर्जुन भोसले सुद्धा हजर होते तसेच रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सोलापूरचे क्राईम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील या धाडसी दरोड्यामुळे पोलिसांसमोर एक प्रकारे चॅलेंज निर्माण झाले आहे. तर पोलीस दलही सदर घटनेचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडत आहे सदर घटनेची तक्रार सौ. करिष्मा गणेश आसबे यांनी दिली आहे. अशा धाडसी दरोडे मुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर घटनेचा तपास लावून पोलिसांनीही अशा जबर गुन्हेगारांना वेळीच शासन दिले तरच अशा घटनांना आळा बसेल.