बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात लोकराजा शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

बार्शी येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात लोकराजा शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

-----------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज): येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय येथे सामाजिक क्रांतीचे प्रणेते,आरक्षणाचे जनक, कृतिशील विवेकी थोर लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुहास बप्पा सुतार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दत्तात्रय जाधव सर, प्रा.संतोष देशमुख सर, मा.संजय बोकेफोडे हे उपस्थित होते. सदर प्रसंगी प्रा.दतात्रय जाधव, सौरभ घाडगे, सुहास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंद मस्के, रोहन आगलावे, हनुमंत तुपे यांचेसह सभासद, वाचक आदी उपस्थित होते, ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.