गादेगावच्या शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये स्वच्छता दिनाचे आयोजन
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पंढरपूर (पंढरी- नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे एक दिवस स्वच्छता अभियान या अंतर्गत विद्यालयातील मुलींनी विद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला मुलांमध्ये स्वच्छतेविषयी आवड निर्माण व्हावी त्याचे महत्त्व समजावे यासाठी हा उपक्रम अतिशय गरजेचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःहून स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन शाळेच्या परिसरातील कचरा मैदानावरील गवत काढून स्वच्छता केली यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरती उत्साह होता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी या स्वच्छतेमध्ये भाग घेतला होता. सरकारने भारत सरकारचा हा एक स्तुत्यपूर्ण उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबविला जात आहे महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबविला जात आहे.
यावेळी सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, सोमनाथ भुईटे, नागेश कांबळे, नियाज मुलाणी, शितल मस्के, मोनाली गायकवाड, मसरूद्दीन पटेल, सिमा रकटे, शितल बागल, वर्षा मोरे, अजय मोरे, संतोष पवार, आदी उपस्थित होते.