गोमय बीज राखी महाराष्ट्रभर महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम :- शेखर मुंदडा
---------------------------------------------------------------------------------
करमाळा (पंढरी नगरी न्यूज ) महा एनजीओ फेडरेशन द्वारा महाराष्ट्रातील १०० ठिकाणी १०० सामाजिक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून गोमय बीज राखी महाराष्ट्रभर पोहचविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी बोलताना दिली. महा एनजीओ फेडरेशन व नवनिर्वाचित महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष यांनी केला होता. जवळपास महाराष्ट्र भर २५०० पेक्षा अधिक सामाजिक स्वयंसेवी संस्था फेडरेशनसोबत महाराष्ट्रभर जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात असे समाजोपयोगी व नानविध आदर्श समजपुढे मांडणारे अभिनव उपक्रम करणारी शिखर संस्था महा एनजीओ परिचित आहे.
महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी यासाठी विशेष समन्वय साधला. प्रत्येकाच्या घरात एक देशी गोमाता अपेक्षित आहे की ज्याने अध्यात्मिक व आरोग्याच्याबाबतीत महत्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते. गाईचे दुधाशिवाय देखील अन्य गोष्टीमधून आपण आर्थिक साक्षर होऊ शकतो. याचेच उदाहरण म्हणून राखीची निर्मिती आहे. गो आधारित अर्थ व्यवस्था, देशी गाईंचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व अर्थव्यवस्था या रचनेवर यंदाची मांडणी फेडरेशनने केली आहे. गोशाळा व गोप्रेमीना यातून रोजगार मिळाला आहे.
महाएनजीओ फेडरेशन सोबत संलग्न असणा-या सोलापूर जिल्ह्य़ातील नवभारत प्रतिष्ठान रावगाव ता .करमाळा या संस्थेने हा उपक्रम राबविला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्याना गोमय राख्या बांधण्यात आल्या.