मराठा भडकला बाभूळगावत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना आजपासून गावबंदी

मराठा भडकला बाभूळगावत  सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना आजपासून गावबंदी

------------------------------------------------------------------------------------
आरक्षणासाठी ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाची बैठक संपन्न..
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून सर्वपक्षीय आमदार , खासदार तसेच अन्य नेते मंडळी हे ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी  मा. सरपंच दशरथ (बापू) चव्हाण  यांनी सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता व कोणालाही या गोष्टीचा त्रास होऊ नये  शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले.

पंढरपूर तालुक्यातील बाभूळगाव येथे आज शुक्रवार दि .२७ रोजी  सकाळी झालेल्या सकल मराठा समाजाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, बाभूळगाव ग्रामपंचायत मधील गावात सर्व समाजाने एकमुखाने सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उपस्थित मराठा युवकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी तसेच विरोधी सर्वपक्षीय नेत्यांना घारेवर धरले. या बैठकीत  'जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत बाभूळगाव गावात राजकीय नेत्याना गावबंदीचा इशारा देण्यात आला. प्रवेश बंदी असतानाही एखाद्या राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्यास, त्यानंतर होणाऱ्या घटनेस तो नेता स्वतः जबाबदार असेल, असा सूचक इशाराही यावेळी देण्यात आला.

"चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष", "जो समाजाला मनात नाही, त्याला समाज मानत नाही", अशा आशयाचे बॅनर बाभूळगाव गावात लावण्यात आले आहेत. सकल मराठा समाज बांधवांच्या बैठकीला समाजातील बहुसंख्य मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.