वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक संतोष भोसले यांचा सिद्धेवाडीत सत्कार.

वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक संतोष भोसले यांचा सिद्धेवाडीत सत्कार.

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) ; पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील संतोष उर्फ आप्पा शिवाजीराव भोसले यांची नुकत्याच पार पडलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकपदी निवड झाल्येबद्दल सिद्धेवाडी येथे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

संतोष भोसले हे सरकोली गटातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत ते सरकोली येथील प्रगतशील बागायतदार तसेच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य स्वर्गीय शिवाजीराव (तात्या )बाळासाहेब भोसले यांचे चिरंजीव आहेत. शिवाजीराव (तात्या )भोसले यांचे घराणे सरकोली गणात मोठे मातब्बर म्हणून ओळखले जात आहे. ते  वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन वसंत दादा काळे यांचे विश्वासू तसेच विठ्ठल परिवाराचे नेते तथा चेअरमन कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे संतोष (अप्पा) भोसले यांना कारखान्याचे नूतन संचालक पद देण्यात आले .

यावेळी मुंबई सेंट्रल पोलीस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजाराम जाधव यांच्या हस्ते नूतन संचालक संतोष (आप्पा )भोसले यांचा सत्कार पर सन्मान करण्यात आला. यावेळी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, संभाजी जाधव, सुभाष जाधव, सुमित जाधव, सूरज भैय्या जाधव, सचिन भोसले, शेखर भोसले  इत्यादी प्रमुख उपस्थित होते.