उद्या भिमा सह.साखर कारखाना चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाची निवडणूक, चेअरमन पदी विश्वराज महाडिक तर उपाध्यक्ष पदी बिभीषण( आप्पा) वाघ यांची निवड निश्चित
------------------------------------------------------------------------------
पंढरपूर - (दै.पंढरी नगरी न्यूज) : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीने एक हाती तिसऱ्यांदा वर्चस्व मिळवित विजय संपादन केला.
कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडी उद्या गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०वा. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार आहेत. अध्यक्षपदासाठी विश्वराज महाडिक आणि उपाध्यक्षपदा साठी पंढरपूर तालुक्यातील फूल .चिंचोली येथील रहिवासी असलेले व खासदार( मुन्ना )साहेब महाडिक यांच्याशी घराण्याशी एकनिष्ठ व विश्वासू असणारे व सर्व सामान्य शेतकऱ्यात सदैव माणसात असणारे बिभीषण( आप्पा) वाघ यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून होत आहे. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सतीश जगताप यांचे नाव मागे पडले आहे.
अध्यक्षपद विश्वराज महाडीक यांच्या निवडीचे संकेत खासदारांनी सभेतही दिले होते. त्यामुळे त्यांच नांव निश्चीत मानले जात आहे. उपाध्यक्षपदासाठी बिभीषण (आप्पा) वाघ यांना संधी नव्या नावावरही शिक्कामोर्तब होवू शकतो कारण भीमा सहकारी कारखाण्याचे कार्यक्षेत्र पंढरपूर तालुक्यात असल्याने राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी उपाध्यक्ष पदाची माळ बिभीशन( आप्पा) वाघ यांच्याच गळ्यात टाकण्यात येणार अशीही चर्चा पंढरपूर तालुक्यातील कारखाना वर्तुळात आहे.त्यामुळे आता व्हाईस चेअरमन पदी बिभीषण आप्पा वाघ यांच्या होणाऱ्या निवडीकडे संबंध पंढरपूर तालुक्यातील गावातील शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.